प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे : कमी पटसंख्येच्या शाळा बंदीचा विरोध

0
6

गोंदिया, ता. १४ : महाराष्ट्र शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा पद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारी धरणे दिले. दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
जिल्हापरिषदेच्या शाळांनी आजतागायत अधिकारी, शासनकर्ते आणि कर्मचारी घडविले. त्या शाळा आता कात टाकू लागल्या. असे असताना महाराष्ट्र शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वस्ती, डोंगर, पाडे, टोले, नक्षलप्रभावित गावांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, शाळा बंद पडल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. गोंदिया जिल्ह्यात एकूण २१७ शाळा या निर्णयामुळे प्रभावित होणार आहेत.महाराष्ट्रातील २४ हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची वेळ येणार आहे. १५ लक्ष रुपये खर्च करून बांधलेल्या शाळा इमारती अतिक्रमणात जातील. शेतमजूर, शेतकरी आणि बहुजनांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हे शासनाचे षडयंत्र आहे. ही सर्व कारणे बघता २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक कर्मचाèयांना १९८५ ची जुनी पेंशन योजना लागू करावी. २५ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयास अनुसरून संच मान्यता अंतिम करून सहायक शिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक यांची पदे विनाविलंब भरावी. आंतर जिल्हा बदली शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढणे, सर्व विद्याथ्र्यांना मोफत गणवेश देण्यात यावे. शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करावा. qबदू नामावलीनुसार पदभरती करण्यात यावी, प्रत्येक शाळेला वीज आणि पाणी मोफत पुरविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठविण्यात आले. निवेदन देणाèया शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, सरचिटणीस एल. यु. खोब्रागडे, पी. आर. पारधी, शेषराव येळेकर, एस. सी. पारधी, मनुताई उके, डी.बी. रहांगडाले, किशोर डोंगरवार, के. पी. रहमतकर, एच. पी. पटले, यु. ए. बघेले, जी. आ़र. गायकवाड, व्ही. ए. नान्हे, एस. जी. कश्यप, डी. सी. तुळशीकर, संदीप तिडके, बी. डब्ल्यू. भानारकर, एन. एस. कोरे, आर. के. बोरकर, आर. आर. शिदणे, बी. सी. डहाट, एन. बी. रहांगडाले, सुशील पाऊलझगडे, विजय पारधी, सुभाष मेमन, आर. एस. बसोने, नरेश बडवाईक, आर. जी. शहारे, सुनिल बावनकर, बी. जी. बरैय्या, जी. ई. येळे, गोवर्धन लंजे, एस. आर. चौधरी, अनूप नागपुरे, वाय. बी. चव्हाण, पी. एन. पटले, बी. सी. ठाकरे, वाय. पी. लांजेवार, संजय हुकरे आदीं उपस्थित होते.