रानडुकराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

0
11

गोंदिया : सरपण गोळा करण्याकरिता शेतात गेलेल्या महिलेवर कळपातील रानडुकरांनी हल्ला चढविला. त्यात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत ‘हिलेचे नाव रेखा शिवदास कुंभरपुरे (रा. किडंगीपार) असे आहे.
रेखा कुंभरपुरे आज, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास स्वयंपाकाला लागणारे सरपण गोळा करण्याकरिता घराशेजारील शेतात गेल्या होत्या. त्यांच्या बाजुने १५ ते २० च्या संख्येत असलेल्या रानडुकरांचा कळप आला. रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली. पोलिस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटना पंचनामा करून तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.