युवा स्वाभिमानने उचलला दहा विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा भार 

0
7
गोंदिया : शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घेण्याची ऐपत आणि तयारी असतानादेखील आर्थिक परिस्थिती आड येत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या परिस्थितीतून विद्याथ्र्यांना सावरण्यासाठी युवा स्वाभिमानने दहा विद्याथ्र्यांना दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी एका प्रशिक्षण संस्थेला या दहा विद्याथ्र्यांचे शिक्षण शुल्क आणि प्रशिक्षण खर्च दान केले. यावेळी युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे, महासचिव वाय.टी.येळे, देवरी तालुकाध्यक्ष भरत शरणागत, जगदीश रहांगडाले, अमोल कटरे, रंजीत बैस, कमलेश बोपचे, रमेश रिनाईत आदि उपस्थित होते.
शैक्षणिक दत्तक योजना राबवून गरजू विद्यार्थी आणि महिलांना शिक्षणाचे दार मोकळे करून देणाNया युवा स्वाभिमानचे निशा गभणे, तुलशी बिजेवार, वैशाली बडघरे, योगीता मेंढे, जयश्री गेडाम, श्रद्धा भालाधरे, जयमाला बन्सोड, राखी बिजेवार, रक्षंदा वासनीक आणि अर्चना वाघाडे यांनी आभार मानले आहे.