नवनिर्वाचित महिला सरपंच व सदस्यांचे तीन दिवसीय क्रांतीज्योती प्रशिक्षण

0
33

गोरेगांव:– यशदा पुणे जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती गोरेगांवच्या सभागृहात नवनिर्वाचित महिला सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत 17 जानेवारी ते 19 जानेवारी 2023 ला तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभय बन्सोड  तसेच पंचायत समिती गोरेगांवचे सभापती मनोज बोपचे, उपसभापती राजकुमार यादव, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम तसेच विस्तार अधिकारी जे.एन. बोरकर, विस्तार अधिकारी टि.डी.बिसेन उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये यशदा पुणेचे प्रविण प्रशिक्षक भूमिका येडे, वर्षा जनबंधू यांनी ग्रामपंचायती चे कायदा नियम, पंचायत राज व्यवस्था, घटना दुरुस्ती, मासिक सभा, ग्रामसभा, सरपंच व सदस्यांचे अधिकार व त्यांची कर्तव्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले या प्रशिक्षणास ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यगण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.