प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणार

0
49

जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व आमदार विजय रहांगडाले यांचे जि.प.कर्मचारी महांसघास आश्वासन

गोंदिया- मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्हा परिषद येथील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी देण्यासंदर्भात जिल्हापरिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने 17 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी प्रलंबित असलेले प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीसह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना देणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिले.
तिरोडा-गोरेगांव विधानसभेतील आमदार विजय रहांगडाले हे जिल्हा परिषद गोंदियाला शासकीय कामानिमित आले असता  जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय रहांगडाले व जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याशी भेट घेऊन प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी मिळण्याबाबत चर्चा केली. चर्चा दरम्यान महासंघ पदाधिकाऱ्यांना कळविले की, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक-06/10/2022 च्या आदेशान्वये जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी सह मंजूर केले आहे. परंतु जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांना सदर भत्ते मंजूर केलेले नव्हते. त्यामुळे लगेच जिप कर्मचारी महासंघ पदाधिऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याशी भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांचे पुढाकाराने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक-07/12/2022 च्या आदेशान्वये 15% प्रोत्साहन भत्ता गोंदिया जिल्हा परिषदेतील शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना मंजूर केलेले आहे. परंतु दिनांक-07/12/22 च्या आदेशान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रोत्साहन भत्याची थकबाकी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देय राहणार नसल्याचे नमुद केले. जेव्हा की सदर प्रोत्साहन भत्ता जिल्हातील शिक्षकांना थकबाकीसह मंजूर केले असल्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेतील शिक्षक व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चर्चेअंती जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व आमदार विजय रहांगडाले यांनी सदर दोन्ही भत्यांची थकबाकी गोंदिया जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना शासनाकडुन मंजूर कण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष व आमदार महोदयांनी कर्मचारी महांसघाचे पदाधिकाऱ्यांना दिले.
निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष पी जी शहारे, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल, उपाध्यक्ष कमलेश बिसेन, लिपीकवर्गीय संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर, महासंघाचे जिल्हा संघटक संतोष तुरकर, सहकार्याध्यक्ष यज्ञेश मानापुरे, चतुर्थ कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागीरथ नेवारे, महासंघ महिला उपाध्यक्ष चित्रा ठेंगरी, महिला समिती अध्यक्ष तेजस्वीनी चेटुले व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.