सामाजिक न्यायमंत्र्याच्या हस्ते साहित्यांचे वितरण

0
5

नागपूर,दि.19-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध या वंचित घटकाच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ देऊन सामाजिक न्याय विभागाचा चेहरा बदलण्याची संकल्पना असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज व्यक्त केले.रविभवन परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ५० स्वयं सहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत ७ लाभार्थ्यांना शेतजमिनीचे सात बाराचे वाटप, नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी सदर येथे तयार होणाऱ्या वसतिगृहाचे उद्घाटन व २५० क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद पाटील, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी गायकवाड, सुनील चिरकुटे, रविंद्र जोंडागळे उपस्थित होते.