नगर परिषदेने लादलेल्या स्वच्छता कराच्या विरोधात आंदोलन

0
13

 तुमसर-नगर परिषद तुमसरच्या माध्यमातून तुमसर शहरातील नागरीकांवर लादलेला स्वच्छता कर प्रती वर्ष प्रती घर ३६0 रुपये व प्रती दुकान ५४0 रुपये ही केलेली वाढ म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक असून, तत्काळ प्रभावाने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीला धरून भाजपा वगळून सर्वपक्षीय धरणे आंदोलन न. प. समोर करण्यात आले.
तुमसर नगर परिषदे अंतर्गत असलेले नागरिकांवर स्वच्छता कराच्या रूपाने प्रती वर्ष प्रती घर ३६0 व प्रती दुकान ५४0 वाढीव कर लादलेला आहे. सामान्य नागरिकांची या करामुळे आर्थिक पिळवणूक करण्याचे काम या कराच्या माध्यमातून होत आहे. जिल्ह्यात कुठेच स्वच्छता कर लावले नसतांना केवळ तुमसर नगर परिषदेच्या माध्यमातून नागरीकांवर अतिरीक्त कर लादण्यात आलेला आहे. याविरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आम आदमी पक्ष, विकास फाउंडेशनतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन केले. दरम्यान मुख्याधिकारी यांनी आंदोलनस्थळी येवून आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. येत्या पाच दिवसांत कराचा निर्णय मागे न घेतल्यास सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन न. प. कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.