नमाद महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त न्यायालयाद्वारे कायदेविषयक कार्यक्रम

0
10

गोंदिया, दि.23 : नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय युवा दिना निमित्त कायदेविषयक कार्यक्रमाचे आयोजन नमाद महाविद्यालय, गोंदिया येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश सकलेश पिंपळे व न्यायाधीश श्रीमती प्राजक्ता ढाने तसेच नमाद महाविद्यालय गोंदियाचे प्राचार्य डॉ.शारदा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

         न्यायाधीश प्राजक्ता ढाने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपले भविष्य साकार करण्याकरिता जोमाने मेहनत अभ्यास करून पुढे जावे असे आवर्जून विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये न्यायाधीश पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद तसेच विविध थोर व्यक्तींचे उदाहरण देऊन कसे ते थोर व्यक्ती झाले व नंतर लोकांचे प्रेरणादायक कसे ठरले व आपले जीवन कसे साकार बनवले याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना संगितीले.

डॉ.शारदा महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना खूप अभ्यास करून पुढे आपले भविष्य छान बनवावे व भविष्यात त्यांना कसलीही मदत कॉलेज तर्फे लागल्यास ते सदैव मदत करण्यास तत्पर राहतील असे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश बैस यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. उमेश उदापुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया येथील कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले.