आमगाव- मुरदोली रस्त्याची दुरवस्था

0
28

देवरी- तालुक्यातील आमगाव (आदर्श) ते मुरदोली या मुख्य रस्त्याचे नवीन बांधकाम सुरू होऊन काही कारणास्तव या रस्त्याचे बांधकाम करण्यास काही कारणास्तव उशीर होत असल्यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यावर सदर कारवाई करून थांबलेल्या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी या क्षेत्रातील नागरिकांनी वरिष्ठाकडे केली आहे.
मुरदोली ते आमगाव (आदर्श) या मुख्य रस्त्याचे काम मार्च ते एप्रिल २0२२ दरम्यान सुरू करण्यात आले असता अंदाजे २ ते २.५00 किमी अंतरापयर्ंत रस्त्याला जेसीबीच्या साहाय्याने खोदण्याचे काम करण्यात आले व त्यापैकी अंदाजे १ ते १.५00 किमी अंतरापयर्ंत गिट्टी पसरवून त्यावर मुरूम टाकण्याचे कामे करून काम बंद करण्यात आले.
तेव्हापासून सदर काम बंद असल्यामुळे पावसाळ्यातील पावसाने रस्त्यावरील मुरूम वाहून गेल्याने गिट्टी उघड पडली आहे. रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍यांना अत्यंत त्रास होत आहे. या रस्त्याने कितीतरी विद्यार्थी सुद्धा शाळेत जात असतात. त्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच मोलमजुरीकरिता जाणार्‍या मजुरांना खूप त्रास भोगाव लागतो. या रस्त्यावर आतापयर्ंत कितीतरी लहान-मोठे अपघात झाले असून कसल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
परंतु, दिवसेंदिवस रस्ता हा अत्यंत खराब होत असल्यामुळे जीवित हानी होणे सुद्धा नाकारता येत नाही. रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तेथील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.