आळंबी प्रशिक्षण वेंâद्र त्वरीत सुरू करा-युवा स्वाभिमानची मागणी

0
4
देवरी : तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी-मजूर आणि बेरोजगारांना लघु उद्योगातून आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी देवरी येथे काही वर्षापूर्वी आळंबी उत्पादन व प्रशिक्षण वेंâद्र उभारण्यात आले परंतु सध्या उत्पादन आणि प्रशिक्षण बंद अवस्थेत आहे. याकडे लक्ष घालून उत्पादन व प्रशिक्षण वेंâद्र त्वरीत सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन युवा स्वाभिमान देवरी संघटनेच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे शेतकरी, शेतमजूर आणि युवा बेरोजगारांना या वेंâद्राच्या माध्यमातून प्रशिक्षीत करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा हेतू होता. परंतु बहुउपयोगी हे प्रशिक्षण वेंâद्र बंद अवस्थेत आहे. उत्पादन व प्रशिक्षण वेंâद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा युवा स्वाभिमान आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना युवा स्वाभिमान देवरीचे तालुकाध्यक्ष भरत शरणागत, ओमप्रकाश पटले, अमोल कटरे, रामानंद बाला, शमशेर पठान, प्रविण राहुलकर आदिंसह युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.