अमरावतीचे माहिती आयुक्त बनसोड यांचा अपघाती मृत्यू

0
32

अमरावती -अमरावती विभागाचे माहिती आयुक्त आणि माजी विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड यांचं कर्नाटकातील हुबळी नजीक आज अपघाती निधन झाले.दत्तात्रय बनसोडBansod Dattatray 1यांच्यासह त्यांचा पत्नी,ड्राईवरचं देखील घटनास्थळीच या अपघातात निधन झालं तर एक मुलगा व एक मुलगी जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.दत्तात्रय बनसोड यांनी प्रशासकीय स्तरावर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.१९८५ मध्ये भू संपादन अधिकारी म्हणून ते प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर राज्यात अनेक जिल्ह्यात महत्वपूर्ण पदे सांभाळली.

१९९६ ते २००२ पर्यंत लातूर येथे भूकंप पुनर्वसन अधिकारी म्हणून कार्य केलं.या काळात लातूर येथे झालेल्या विनाशकारी भूकंपातून २७ गावांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या बनसोड यांनी पार पाडली.२०१२ ते २०१४ पर्यंत बनसोड यांनी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्य केलं.या दरम्यान शेगाव विकास आराखडा,मोझरी विकास आराखडा आणि कौन्डीण्यापूर विकास आराखड्यासारखे महत्वपूर्ण विकास कार्य झाले.३१ जुलै २०१४ रोजी प्रशासकीय सेवेतून ते निवृत्त झाले ज्या नंतर त्यांचाकडे अमरावती विभागाचे माहिती आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.