अर्जुनी.मोर पं.स.वर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा धरणे आंदोलन

0
16

अर्जुनी.मोर,-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक)तर्फे 15 फेब्रुवारीला एसडीओ कार्यालय समोरून तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष काॅ.मिलिंद गनविर, जिल्हाध्यक्ष चत्रुघण लांजेवार, तालुकाध्यक्ष ईश्वरदास भंडारी ,सचिव खोजराम दरवड़े व जिल्हा कार्यकारिणी सदस्य खुशाल बनकर यांचे नेतृत्वात निघालेल्या मोर्च्याचे शिष्टमंडलाने बिडीओ कार्यालयात अधिक्षकाना निवेदन सादर केले. यात आनलाइन वेतन कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात नियमित जमा होने व ऊर्वरित रक्कम व राहणीमान भत्ता दर माह ग्रामपंचायत कड़ुण कर्मचाऱ्यांना अदा करणे, भत्ता व वेतनाच्या एकुण रकमेवर वर 8.33 टक्के रकम भ.नि.नि. खात्यात जमा करणे ,सेवा पुस्तिका अद्ययावत करणे, नियमा प्रमाणे दर तिन महिण्यात पं.स.स्तरावर तक्रार निवारण समितीची सभा घेणे, कर्मचाऱ्यांची शेवासर्तीची अमलबजावणी करिता पंचायत समिती स्तरावर कर्मचाऱ्यांचे रेकार्ड तपासणी करणे तसेच अमलबजावणी न करणा-या व कर्मचा-यांचे आर्थिक शोषण करणा-या ग्रामसेवकांवर शिस्तभंगाजी कार्यवाई ची मागणी करण्यात आली, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हाव्यापी आंदोलनान्वये 1 मार्चला गोंदिया जिल्हापरिषदेवर होणा-या बेमुदत धरणे आंदोलनात सर्व कर्मचा-यांना शामील होण्याचे आवाहन मिलिंद गनविर व चत्रुघण लांजेवार यांनी केले. या मोर्च्यात प्रामुख्याने अशोक परशुरामकर, माणिक शहारे, यादोराव वारजुरकर, सुरज रामटेके,सतिष साखरे,सचिन सांगोड़कर देवेन्द्र दुरूगकर, ईत्यादी तालुक्यातील सर्व कर्मचारी शामील होते.