गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार बनले म्हेत्रे,वाहतूकचे बनसोड गंगाझरीला

0
51
तिरोड्याचे तायडे नक्षल सेलमध्ये,तर कंट्रोलचे भांडारकर वाहतूक शाखेत
गोंदिया,दि.16- राज्यातील पोलीस दलात सध्या आंतरिक बदल्यांचे सत्र सुरु असून गडचिरोली-गोंदिया क्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदिप पाटिल यांच्या परवानगीने गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी 9 पोलीस निरिक्षकांच्या आंतरिक बदल्या केल्या आहेत.पोलीस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी हे फेरबदल असल्याचे बोलले जात आहे.वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक महेश बनसोडे यांना राज्यमार्गावरील महत्वाच्या गंगाझरी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.तर गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन म्हेत्रे यांनी आपल्या कार्यकाळात गोरेगाव पोलीस ठाणे क्षेत्रात केलेल्या चागंल्या कार्यामुळे गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.तर गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अजय भुसारी यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात हलविण्यात आले आहे. तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांच्याकडे नक्षल सेल व आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली.कंट्रोल रुमचे जयेश भांडारकर यांच्याकडे आता जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.शहरातील अस्तव्यस्त वाहतुकीवर भांडारकर कशापध्दतीने नियंत्रण आणतात याकडे लक्ष लागले आहे.त्याचप्रमाणे कंट्रोल रुममधील पोलीस निरिक्षक देवीदास कठाळे यांना तिरोडा,गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बाबासाहेब बोरसे यांना सालेकसा,कंट्रोल रुमच्या पोलीस निरिक्षक नंदीनी चानपुरकर यांना अ.मा.वा.प्र. कक्ष गोंदिया व अतिरिक्त प्रभार मानव संसाधन शाखेत हलविण्यात आले आहे.अ.मा.वा.प्र.विभागाचे पोलीस अधिकारी सतीश जाधव यांना दवनीवाडा येथे हलविण्यात आले.