40 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
11
**डॉ.चौधरी यांनी केले तुमसरचे वातावरण  शिवमय
तुमसर: तुमसर येथील राजमुद्रा ग्रुप द्वारे शिवजन्मोत्सव सोहळा गेल्या आठ वर्षापासून साजरा करण्यात येत आहे.३९३ व्या शिवजयंतीचे अवचित्त साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.छत्रपती शिवाजी कालीन शिवमय गोष्टी आपण जे विसरत चाललोय ते समोर आणण्यासाठी विविध पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
शालेय विद्यार्थ्यांना महाराजांच्या काळातील पारंपारिक गोष्टी अनुभवता येईल हे दृष्टिकोन ठेवून १६/२/२०२३ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी पोवाडा गायन,पारंपरिक आनंद मेळावा,पारंपारिक वेशभूषा, व्याख्यान स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले होते.यात शारदा विद्यालय,जनता विद्यालय, भारती कन्या विद्यालय, सरस्वती शिशु  मंदिर विद्यालय,नेहरू विद्यालय, शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शासनाला मदत व्हावी म्हणून १७/२/२०२३ रोजी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते. या ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. महत्त्वाचे बाब म्हणजे रक्तदानासाठी शासकीय अधिकार्यांनी पुढाकार घेतला त्यात तुमसरचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम सर, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर सर, तुमसरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लांबट यांनी सुद्धा रक्तदान केले.
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास शालेय विद्यार्थ्यांपर्यंत व त्यांच्या पाल्यांपर्यंत व घराघरात पोहोचवता यावा यासाठी डॉ.दिलीप चौधरी यांचे व्याख्यान आयोजित केले गेले होते. व्याख्यानाला हजारोच्या संख्येत उपस्थिती लावत लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले.
 यावेळी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजि.सागर गभने यांनी सांगितले की आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांची शिकवण विद्यार्थ्यांना जे आपल्या देशाचे भविष्य आहे त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. व पुढेही असे कार्यक्रम घेत राहू असे सांगत कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा ग्रुप महिला मंडळ व पुरुष मंडळ यांचे आभार मानले.