पीडितेच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करा

0
9

पवनी : स्थानिक शाळकरी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन मानव जातीला काळीमा फासणार्‍या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जवाहर गेटजवळ मोर्चाचे समारोपप्रसंगी केली.
शिवसेना पक्षातर्फे पवनी बंद व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेलघाटा वॉर्डातून निघालेल्या या मोच्र्याचे समापन गांधी चौकात झाले. व्यापारी संघाच्या पदाधिकार्‍याने दुकान बंद करण्यास नकार दिल्याने थोड्या वेळांसाठी तणाव निर्माण झालेला होता. पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांनी परिस्थिती हाताळून मोर्चाथांबविण्यास सांगितले. मोर्चामाघारी परतला व जवाहर गेटसमोर सभा घेण्यात आली.
यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्वात शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, न.प. पवनीच्या अध्यक्षा रजनी मोटघरे, विजय काटेखाये, संजय रेहपाडे, राजू ब्राम्हणकर, शिवा फंदी यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या.
पक्षाच्या स्थानिक आमदारांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वनदेखील केलेले नाही असा विचार व्यक्त कर्‍यात आला.
पीडित मुलीला पाच लक्ष रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी केली. याप्रसंगी नगरसेवक नरेश बावनकर, सुरेखा देशमुख, माया खापर्डे, बाळू फुलबांधे, मुन्ना तिघरे व कार्यकर्ते उपस्थित होते.