सामाजिक न्यायमंत्र्यांचे ओबीसी समाजाप्रती अपशब्द !

0
10

तिव्र आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा

गोंदिया, ता. २८ : ओबीसी विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती आणि समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यास गेलेल्या ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारल्यानंतर सरकारविरोधी घोषणाबाजीनंतर सामाजिक न्यायमंत्र्यांनी चक्क ‘ओबीसींच्या अंगात आली. जास्त राजकारण करता असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. मंत्र्यांनी आपले शब्द मागे घ्यावे, अन्यथा होणाèया परिणामास तयार राहावे, असा इशारा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे व कार्याध्यक्ष अमर वराडे,मनोज मेंढे,बी.एम.करमरकर,कैलास भेलावे यांनी दिला.

यासंदर्भात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी भ्रमणध्वनीवर मी असे बोललोच नाही,अाणि बोललो असेल तर मला क्लिप दाखवा.मी तर तुमच्या शिष्टमंडळाला आत बोलावले आणि जो वाचून वाचून नारेबाजी करीत होता,त्याला माझे म्हणने होते.आघाडी सरकारपासून हा प्रश्न रेंगाळत आहे मी तर अधिवेशनानंतर मुंबईला बैठक घेण्याचेही आश्वासन दिले होते.परंतु हा सर्व राजकारण अाहे,मला काहीही बोलायचे नाही अशी प्रतिक्रिया बेरार टाईम्सला त्यांनी दिली.

पोवार बोर्डिंगमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते आज,सोमवारी दुपारी बोलत होते. बबलू कटरे पुढे म्हणाले, ओबीसी समाज लोकसंख्येने देशाच्या लोकसंख्येत अध्र्यापेक्षा जास्त आहे. या समाजाला घटनेने अधिकार दिले. मात्र, या समाजाची आत्तापर्यंतच्या सर्वच सरकारांनी बोळवण केली. आज राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या शिष्यवृत्तीकरिता नऊ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा करण्याची मागणी केली होती. परंतु, सत्ता आल्यानंतर त्यांना आपल्याच मागण्यांचा विसर पडला. समाजाच्या विविध मांगण्यांना घेवून ओबीसी संघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळ सामाजिक न्यायभवन परिसरात जमले. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला. मंत्र्यांनी शिष्टमंडळाला न्यायभवन परिसरात बोलावले. त्यामुळे शिष्टमंडळातील ओबीसी बांधव सामाजिक न्यायभवन परिसरात पोहोचले. मंत्री राजकुमार बडोले यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर कार्यकर्त्यानी ‘ मुख्यमंत्री हाय हाय,महाराष्ट्र सरकार हाय हाय, पालकमंत्री हाय हाय, ओबीसी शिष्यवृत्तीचे झाले काय अशा घोषणा दिल्या. त्यामुळे चिडून ‘तुमच्या ओबीसींच्या अंगात जास्त आली  काय असे उदगार काढले. समाजाच्या हिताकरिता असलेल्या मंत्रालयाच्या प्रामुखाने ओबीसींबाबत असे वक्तव्य केल्यामुळे ओबीसी कृती संघर्ष समितीफेर् त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. मत्र्यांनी आपले शब्द मागे घ्यावे, अन्यथा त्यांना गाव आणि जिल्हाबंदी करण्यात येईल. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटतील,त्याला राज्य शासन संपूर्ण जबाबदार राहील, असा इशाराही पत्रपरिषदेत बबलू कटरेसह सर्व पदाधिकारी यांनी यावेळी दिला. अनेकदा ओबीसींच्या शिष्टंमडळाने ‘मंत्री राजकुमार बडोले यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते जाणून ओबीसींना भेटण्याचे टाळतात. ओबीसी समाजाप्रती सामाजिक न्यायमंत्री उदासीन असल्याचा आरोप अमर वराडे यांनी केला. यावेळी कैलाश भेलावे,मनोज मेढे,मनिष चौरागडे, प्रभाकर दोनोडे,शिशिर कटरे, सावन कटरे, बी. एन. करमकर, आशिष नागपुरे, लोकचंद रहांगडाले, भूपेंद्र हरिणखेडे, विनायक येडेवार, शंकर लहाने, सुनील पटले, मिलिंद समरीत, राजेश नागरिकर, शुभम बनोठे, रोहित नंदागवळी, अजय रामटेके, शैलेश चिखलोंढे, योगराज उपराडे, कृपाल लांजेवार, चोकलाल येळे, राजकुमार फाये, युवराज येळे आदी उपस्थित होते.