खा.पटोलेंचाही केला ओबीसी कृती समितीने घेराव

0
7

गोंदिया-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाप्रती काढलेल्या उदगारामुळे ओबीसी संघर्ष कृती समितीने त्रीव भूमिका घेत जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनाही गोंदियात आले असता फूलचूर नाक्यावर त्यांचा घेराव करुन शासनाच्याविरोधात घोषणाबाजी केली.खा.पटोले यांनी ओबीसी कृती समितीच्या पदाधिकार्यांशी चर्चा करतांना म्हणाले की, ही समिती सर्वपक्षीय असल्याने राजकारणाचा संबध येत नाही.परंतु सामाजिक न्याय मंत्र्यानी असे शब्द काढले असतील तर ते योग्य नाही,त्याबद्ल त्यांना विचारणा करतो,ते असे बोलणार नाही असे मला वाटते.तरीही आपल्या आग्रहास्तव राज्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी झालेल्या प्रकरणाबद्दल चर्चा करणार असे सांगत आपण ओबीसी मुद्यावर तुमच्यासोबत आहे वेळप्रसगी ओबीसीसाठी पक्षाच्या भूमिकेलाही विरोध करणार असे सांगितले.यावेळी ओबीसी कृती समितीच्यावतीने खा.पटोले यांच्याविरोधातही नारेबाजी करीत आश्वासन नको भूमिका स्पष्ट करा अशी जाहिर भूमिका मांडली.