बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी – पालकमंत्री राजकुमार बडोले

0
6

गोंदिया,दि.२८ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यात येत आहे. बचतगटातील महिला हया व्यवसायासाठी घेतलेले कर्ज त्या वेळीच परतफेड करतात. बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाली तर बचतगट खऱ्या अर्थाने सक्षम होतील. असा विश्वास पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सुभाष मैदान येथे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील स्वयंसहायता बचतगट व कारागिरांनी तयार केलेल्या मालाची व वस्तूंच्या पलास २०१५-१६ प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे विशेष शुभेच्छुक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीष कळमकर यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५५६ ग्रामपंचायत अंतर्गत ११,३४६ महिला बचतगट कार्यरत आहे. जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्यात १०० बचतगट आपल्या स्टॉलद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री ३१ मार्चपर्यंत करणार आहे.