भाजप जिल्हा परिषद क्षेत्र सोनीच्या वतीने निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन

0
19

गोरेगाव : भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद क्षेत्र सोनीच्या वतीने निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ मार्च २०२३, रविवार, सकाळी ११ वाजता, नरसिंह प्राथमिक शाळा, सोनी येथे करण्यात आले आहे.सोबतच विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रोग निदान शिविराचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक व गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले तर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलक म्हणून हेमंत पटले प्रदेश उपाध्यक्ष भाजप व गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार खोमेश रहांगडाले उपस्थित राहणार आहेत.

सदर रोग निदान शिविरात हृदयरोग, किडनीरोग, मधुमेह, ब्रेन आणि स्पाईन सर्जरी, ब्रेन संबंधी रोग, सर्व प्रकारच्या आपतकालीन सर्जरी, हाडे संबंधी रोग, दमा, टी.बी., श्वास संबंधी आजार, पोटाचे आजार, रक्त दोष, प्रसूती संबंधी उपचार, नाक, कान, गळा संबंधी आजार, घेंगा रोग अशा विविध आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत.