चित्ररथाद्वारे शासनाच्या योजनांची प्रचार – प्रसिध्दी

0
11

भंडारा : शासनाच्या नवीन घोषित योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात असून आज जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाचा शुभारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 

हा चित्ररथ महिनाभर फिरणार असून आजपासून 6 एप्रिल पर्यंत भंडारा तालुक्यात 60 गावे, 7 ते 11 एप्रिलपर्यंत पवनी तालुक्यात 50 गावे, 12 ते 16 एप्रिलपर्यत लाखांदूर तालुक्यात 40 गावे, 17 ते 21 एप्रिलपर्यंत साकोली तालुक्यात 40 गावे, 22 ते 25 एप्रिलपर्यंत लाखनी तालुक्यात 40 गावे, 26 ते 28 एप्रिलपर्यंत तुमसर तालुक्यात 30 गावे, 29 ते 1 मेपर्यंत मोहाडी तालुक्यात 35 गावे असून एकूण 295 गावामधील जनतेला या योजनांची माहिती देणार आहे. जनतेने गावात चित्ररथ आल्यावर सर्व योजनांची माहिती जाणून घ्यावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांनी सुध्दा योजनांची माहिती करुन घेऊन ग्रामीण लोकांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कृषि अधिकाऱ्यांनी चित्ररथासोबत असलेल्या व्यक्तींना सहकार्य करुन कृषि विभागातील माहिती पत्रके तसेच इतर साहित्य त्यांना देऊन योजनांची माहिती लोकांना द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.