पुष्पा गणेडीवाला,पहिल्या महिला नागपूर जिल्हा ‘प्रधान न्यायाधीश’

0
12

नागपूर- जिल्हा न्यायालयाच्या पहिल्या महिला प्रधान न्यायाधीश म्हणून पुष्पा गणेडीवाला यांची उच्च न्यायालयाने नियुक्ती केली. प्रधान जिल्हा न्यायाधीश किशोर सोनावणे यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाल्यानंतर सोनावणे यांच्या रिक्त पदी गणेडीवाला यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीपूर्वी गणेडीवाला या ठाणे जिल्ह्यातील उत्तान -भायंदर येथील महाराष्ट्र न्यायिक अकादमी आणि भारतीय मध्यस्थी केंद्राच्या सहसंचालक होत्या.
न्यायाधीश गणेडीवाला या २०१० मध्ये नागपूर जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून होत्या. ह्या एम.कॉम, एलएलएम गोल्ड मेडॅलिस्ट आहेत. त्याचबरोबर त्यांनी नेट-सेट सुध्दा केलेले आहे. भारताच्या सर्वात जुन्या सॉलिसिटर फर्म मेसर्स क्रावफोर्ड बेली अँण्ड कंपनी, फोर्ट मुंबई येथील कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली केली आहे. त्यांची ऑक्टोबर २००७ मध्ये थेट जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.