बीड पॅटर्नप्रमाणे महाआरोग्य तपासणी शिबिर घ्या – किशोर तिवारी

0
11

वर्धा : महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून बीड जिल्ह्यात बहुसंख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली. तशाचप्रकारे वर्धा जिल्ह्यातही महाआरोग्य शिबिराचा लाभ येथील सर्व दवाखाने, सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून एकत्रित येऊन रूग्णांना देण्यात यावा, अशा सूचना कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केल्या. 

जिल्हा सामान्य रूग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आदी उपस्थित होते.