एफडीआय बनले धृतराष्ट्रः रक्ताच्या पिशवीवरून qकमत झाली गहाळ

0
10

खेमेंद्र कटरे
गोंदिया – कोणत्याही वस्तूची खरेदी करताना आपण त्या वस्तूची जी महत्तम किंमत देतो तिला त्या वस्तूची मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे एमआरपी असं म्हटले जाते. ही एमआरपी ही त्या वस्तूच्या पाकिटावर दर्शविणे हे नियमाने बंधनकारक आहे. परंतु, आपण जर रक्त घेत असाल तर मुंबईच काय तर गोंदियाच्या रक्तपेढीतही या नियमाला तिलांजली दिली जात असल्याचे दिसून येते. याप्रकरणी कारवाईचा अधिकार असलेले अन्न व औषधी प्रशासन मात्र गेल्या कित्येक वर्षापासून धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत आहे.
महाराष्ट्र अन्न व औषधी प्रशासन (एफडीए)च्या १९९२ च्या रक्ताच्या किमतीशी संबंधित निर्णयानुसार, प्रत्येक रक्त थैलीवर त्याची qकमत अंकित करणे आवश्यक आहे. असे असताना अनेक वर्षे लोटूनही हा निर्णय फक्त कागदोपत्री ठरला आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई शासकीय महिला रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या रक्ताच्या पिशवीवर त्याची किंमत कुठेही अंकित नसल्याचे दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या जानेवारीपासून एकदाही एफडीएच्या चमूने या रक्तपेढीला भेटही दिली नसल्याचे समोर आले आहे. एफडीएचे अधिकारी आलेच तर ते कागदपत्रे आणि रेकॉर्ड व्यवस्थित आहे की नाही, फक्त एवढेच तपासून माघारी जात असल्याचेही सांगण्यात येते.
गोंदिया रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी डॉ.ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, ३५ दिवसानंतर रक्त नासतो, तो कामात येत नाही अशा रक्ताच्या पिशव्या लगेच नष्ट करण्यात येतात. परंतु, गोंदियाच्या रक्तपेढीत मात्र अशी परिस्थिती उद्भवत नाही. याठिकाणी मागणी खूप असते. परंतु, वर्षातून दोन चार रक्ताच्या पिशव्या मुदतबाह्य होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

काय आहे एफडीएचा निर्णय

अन्न व औषधी प्रशासनाने २४ वर्षापूर्वी रुग्णांना धोखाधडीपासून वाचविता यावे, यासाठी एक परिपत्रक काढला.१९९२ च्या या परिपत्रकातील तरतुदीनुसार, रुग्णालयात दिल्या जाणाèया होल ब्लड व ब्लड काम्पोनेंटसच्या बॅगवर लागलेल्या लेबलवर रक्ताची किंमत आणि त्यासंबधातील आवश्यक माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. रक्त खरेदी करतेवेळी एमआरपी किंमत लिहिलेली असावी जेणेकरून रक्त घेणाèया फसविला जाऊ नये. परंतु, गोंदियाच्या रक्तपेढीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता रक्त गोळा करण्यात येणाèया रिकाम्या पिशवीवर किंमत दिसून आली, मात्र रक्त असलेल्या थैलीवर रक्ताची किंमत दिसून आली नाही, हे येथे महत्त्वाचे.

एफडीए झाले नापास
२४ वर्षानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आरटीईतून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसारख्या शहरातील ७ पैकी ६ शहरातील रक्तपेढ्यांकडे असे कुठलेही परिपत्रक नाही. त्यातही गोंदियात मात्र एफडीएची खूप मोठी माहिती असलेली पुस्तक असल्याचे रक्तपेढीतील कर्मचारी सांगतात. वास्तविक गोंदियातील शासकीय रक्तपेढीतून शासकीय रुग्णालयातील रुग्णासोबतच खासगी रुग्णालयातील रुग्णांनाही रक्त लागल्यास रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे त्या रक्तपिशवीवर रक्ताची किंमत असायला हवी. परंतु, ती पाकिटावरून हद्दपार झाली असली तरी रक्तपेढीच्या qभतीवर आणि दारावर मात्र लिहिलेली बघावयास मिळाली.