आजपासून तलाठय़ांचे लेखणीबंद आंदोलन

0
13

गोंदिया : तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारपासून (दि.६) लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
बनाथरचे तलाठी पी.बी. निमजे व दासगावचे बी.एन. वरखडे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, तहसीलदार संजय पवार व उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांचे स्थानांतरण करा यासह अन्य मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.५) काळी फीत लावून काम केले. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानंतर गुरूवारपासून (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाने पत्रकाद्वारे दिली आहे