चिखली आरोग्य शिबिरात ६२४ जणांची आरोग्य तपासणी

0
14

तिरोडा- तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून आमदार आदर्श ग्राम चिखली येथे एक दिवसाचे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात चिखली येथे ६२४ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उद््घाटन जि.प. सदस्य प्रिती रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं.स. चे उपसभापती नंदकिशोर पारधी, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कैलास पटले, खंडविकास अधिकारी मानकर उपस्थित होते.
यावेळी प्रिती रामटेके म्हणाल्या, गावातील सर्व जनतेनी आरोग्य शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करुन आपले आयुष्य वाढविले पाहिजे व आमदार आदर्श ग्राम या योजनेला सार्थक ठरवून राज्यात गावाचे नाव उंचावले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर पारधी यांनी स्त्रीयांना आपल्या आरोग्याबाबत जागृत राहून काळजी घेतली पाहीजे, स्त्रीच्या हाती पाल्याची दोरी ती जगाचे उद्धारी अशा शब्दात गौरव करुन बालके, मुली यांनी तसेच युवकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरात सिकलसेल तपासणी, दंत विकार, नेत्र विकास, मोतिबिंदू, स्त्री रोग तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. चंद्रशेखर पारधी, डॉ. अनिल आटे, डॉ. निर्वता मेश्राम, डॉ. राम खोब्रागडे, डॉ. सिंग या तज्ज्ञांनी रोग्यांची तपासणी केली.