बदलीनंतरही जीएडीचे कर्मचारी तळ ठोकून,यावर्षीच्या बदल्यामध्ये होणार इतरांवर अन्याय

0
12

गोंदिया,दि.19- राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी समुपदेशन कार्यशाळेपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर लावण्याचे निर्देश आहेत.त्यानुसार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सुध्दा यावर्षी बदलीपात्र कर्मचारी अधिकारी यांची लावण्यात आली.व आक्षेप नोंदवण्यासाठी 26 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली.गट क वर्गातील बदलीपात्र यादीकडे बघितल्यास सोबतच या यादीमध्ये 2018,2020,2021 व 2022 मध्ये बदली झालेल्या पण आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या कर्मचार्यांची नावे पुन्हा यादीत आली आहेत.त्यामुळे या बदली झालेल्या कर्मचार्यांनी बदलीच्या ठिकाणी रूजू नह होता इतरावर अन्याय करीत मुख्यालयातच आपला बस्तान मांडला आहे.यामुळे यावेळी तरी मुख्य कार्यकारी अधिकारी या कर्मचार्यांना मुख्यालयाबाहेर खरोखरच हलवतात की शासनाचे निर्देश म्हणून बदलीप्रकियेचे सोपस्कार पार पाडतात याकडे लक्ष लागले आहे.

त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागात कार्यरत टी.के.मांदारकर यांची बदली 2018 मध्ये झाली,परंतु ते गेल्या पाचवर्षापासून सामान्य प्रशासन विभागातच तळ ठोकून बसले असून बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत.त्यांच्यासोबतच वाय.बी.धावडे यांची बदली 2020,जिल्हा परिषद हायस्कुल काटीचे एस.ए.काळे यांची बदली 2021,यांत्रिकी विभागातील आर.एस.राऊत ,प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथील आर.एम.हत्तीमारे,पंचायत समिती सालेकसाचे आर.एम.चौधरी,सामान्य प्रशासन विभागातील के.पी.येल्ले,कृषी विभागातील ए.एस.बोपचे,प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथील कु.सविता राठोड व प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील पी.जी.देशभ्रतार या सर्वांच्या बदल्या 2021 मध्ये झालेल्या आहेत.त्यास आज दोन वर्षाचा काळ लोटला असून अजूनही ते बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत.मागच्यावर्षी विस्तार अधिकारी सांख्यिकीच्या बदलीमध्येही सामान्यप्रशासन विभागाने इतरावंर अन्याय केल्याचे दिसून आले.

बांधकाम विभागात कर्मचारीसंख्या पुर्ण असतानाही काही अधिकारी वर्गांने कंत्राटदारासोबत मिळून कामे करण्यासाठी तीन ते चार कर्मचार्र्यांची प्रतिनियुक्ती केलेली आहे.विशेष म्हणजे 31 मार्चपर्यंत त्या कर्मचायाची मुदत असतानाही ते प्रतिनियुक्तीवर आलेले कर्मचारी आजही बांधकाम विभागात कार्यरत असल्याने मूळ आस्थापनेवर असलेले कर्मचारी मात्र रिकामटेकडे बसले आहेत.त्या प्रतिनियुक्तीवरील कर्मचारीवर्गामुळेच जिल्हा परिषदेत बग्गा प्रकरण घडले असून जि.प.चे  वरिष्ठ अधिकारी यात सहभागी आहेत.त्याप्रकरणातही पोलीस विभाग शांत बसल्याने चुकीचे काम करुन मलिदा खाणार्या या प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्यांचा मनोबल वाढल्याची चर्चा आहे.