अंंधश्रध्देला दूर करण्यासाठीच जादूटोणाविरोधी कायदा-प्रा.श्याम मानव

0
29

गोंदिया- महाराष्ट्राला संत परंपरेसोबतच फुले,शाहू ,आंबेडकरांच्या परिवर्तनावादी विचारांची साथ मिळाल्याने आपला राज्य पुरोगामी राज्य म्हणून गणला जातो.परंतु याच पुरोगामी राज्यात मोठ्याप्रमाणात अंधश्रध्दा असून त्यापोटी अनेकाचें जीव जाऊन काहींचे संसार उध्वस्त झाले आहेत.अशा या गोष्टींवर आळा घालण्याच्या उद्देशानेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगातला सर्वात पहिला कायदा महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये अस्तित्वात आणण्याचा विचार केला.आणि २०१३ मध्ये त्यास विधानसभेची मंजुरी देऊन कायद्यात रुपांतर करुन अघोरी,अनिष्ठप्रथा व जादुटोणासारख्या अंधश्रध्देवर चालणाèया प्रथांना गुन्हेगारीचे रुप देऊन भोळ्याभाबड्यांना लुबाडणाèयांवर अंकुश ठेवण्याचे काम जादुटोणा विषयक कायद्याच्या माध्यमातून होत असल्याचे विचार अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी व्यक्त केले.ते सामाजिक न्याय विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे वरिष्ठ सदस्य प्रा.एच.एच.पारधी होते.प्रमुख अतिथी म्हणून मराठी पत्रकार संघाचे सचिव विरेंद्र जायस्वाल,सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त मंगेश वानखेडे,जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिqलद रामटेके,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी पुढे बोलतांना प्रा.मानव म्हणाले की,स्वातंत्रकाळातही पत्रकारांची भूमिका महत्वाची होती,तीच भूमिका आजही आहे.पत्रकार हा समाजघडविण्याचे काम करतो.तेच काम पत्रकारांना समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी यापुढेही करावयाचे असून जादूटोणा विषयक qकवा अंधश्रध्देला पाqठबा देणारे वृत्त जर प्रकाशित केले गेले तर राज्यात अस्तित्वात असलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पत्रकारानाही सहा महिने आणि पाच हजार रुपयाच्या दंडाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे,त्यामुळे भविष्यात अशाबाबींचे वृतांकन करतांना आपल्या बातमीमूळे जादूटोणा व अंधश्रध्देला खतपाणी घालणारे वृत्त दिले जाणार नाही,याची खबरदारी सुध्दा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.आम्ही रुढी परंपरांचा विरोध करीत नाही,परंतु त्या नावावर चालणाèया अंधश्रध्देतून समाजात होणारे नुकसान धोकादायक आहे ,हे पटवून देण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात प्रशिक्षण देण्यात आल्याचेही म्हणाले.यावेळी विविध जिल्हा कृषी अधिक्षक चव्हाण,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चव्हाण,कार्यकारी अभियंता पांडे,ओबीसी महामंडळाचे मुळे,उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी ,जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके,सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक उपायुक्त मंगेश वानखेडे यांनी आपल्या विभागांच्या योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एच.एच.पारधी यांनी सामाजिक न्याय विभागातंर्गत येणाèया प्रत्येक विभागानेच नव्हे तर इतर विभागाने सुध्दा आपल्या योजनांची अमलबजावणी ही फक्त उदिष्ठपुर्तीसाठी न करता ती समाजापर्यंत अधिकाधिक पोचविण्यासाठी पत्रकारांशी नेहमीच समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे विचार व्यक्त केले.बाबासाहेबांनी दाखविलेला समतेचा मार्ग गरीब मागासवर्गीयापर्यंत पोचविण्याची आजही गरज असल्याचे ते म्हणाले.प्रास्तविक मंगेश वानखेडे यांनी केले.संचालन सामाजिक कार्र्यकत्र्या सविता बेदरकर यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.यावेळी उपस्थित सर्व पत्रकांना बार्टीअंतर्गत १४ पुस्तकांचा संच वितरीत करण्यात आले.कार्यशाळेला समाजकल्याण विभागासह,माहिती विभाग व बार्टीचे स्वयसेवक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.