आ.रवि राणा यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

0
7
गोंदिया : युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवि राणा यांच्या कार्यालयावर शुक्रवारी  हल्ला करून तोडफोड करणाNया हल्लेखोरांना अटक करून त्वरीत शिक्षा करा, अशा मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्पâत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या समर्थकांनी आ.राणा यांच्या कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली असा आरोप युवा स्वाभिमानने केला असून हल्लेखोरांना त्वरीत अटक करून कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात आज (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयामार्पâत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमानचे संयोजक सुनिल वाघमारे, उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे, कृपाल हजारे, जगदीश रहांगडाले, भरत शरणागत, अरविंद टेंभरे, राजेश हरिणखेडे, वाय.पी.येळे, जीवन शरणागत, कमलेश राणे, देवलाल बिसेन, कृष्णा हरिणखेडे, महेश हरिणखेडे, विजय पटले, गौरव हरिणखेडे, अरविंद टेंभरे, दुर्गेश चव्हाण, उमेश गौतम, महेंद्र शरणागत आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हल्लेखोरांना अटक न झाल्यास गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमान रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.