महाराष्ट्र दिनी फडकवणार विदर्भाचा झेंडा

0
4

नागपूर-वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी, यासाठी १ मे रोजी विदर्भवादी संघटनांतर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार असून महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे हे स्वत: नागपूरात विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत.