डॉ.प्रकाश धोटे यांना समर्पित कार्यकर्ता पुरस्कार

0
6
गोंदिया : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गोंदिया जिल्हा संघटक डॉ.प्रकाश धोटे यांना समर्पित कार्यकर्ता पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुलडाणा येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यस्तरीय समर्पित पुरस्काराने धोटे यांचा गौरव करण्यात आला. मागील २२ वर्षापासून धोटे यांचे गोंदिया जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अखंडीतपणे सुरू आहे. १५०० पेक्षा अधिक जनजागरणाचे कार्यक्रम त्यांनी घेतले. शेकडो चमत्कारीक वाटणाNया घटनांचा भंडाफोड करून त्यामागील सत्य त्यांनी उघडकीस आणले. अंधश्रद्धेवरून होणारी भांडणे त्यांनी जनजागृतीतून सोडविली. मानसिक रोग्यांचे समुपदेशन केले. युवकांना जागृत करून वैज्ञानिक दृष्टीकोनाची चळवळ उभी करून ७०० पेक्षाही अधिक स्वयंसेवकांची चमु तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले. कुठलीही शासकीय मदत नसताना देखील त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य तथा समाज कार्याची दखल घेवून समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यासह छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या पाच राज्यात त्यांनी शिबीरे घेवून कार्यकत्र्यांना प्रशिक्षीत केले आहे. धोटे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोंदिया जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी तथा कार्यकत्र्यांनी अभिनंदन केले आहे.