सुरजागड लोहप्रकल्प झाला नाही तर राजीनामा देऊ-खा. नेते

0
10

गडचिरोली-: वर्षभराने होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून विरोधक सुरजागड लोहप्रकल्पास विरोध करीत असल्याचा आरोप करुन खा. अशोक नेते यांनी आज वर्षभरात लोहप्रकल्प जिल्ह्यात झाला नाही, तर खासदारकीचा राजीनामा देऊ, अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली.

लॉयड्स मेटल्स कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरुन लोहखनिज उत्खनन करुन ते अन्य जिल्ह्यात नेले जात असल्याने एटापल्ली तालुक्यातील नागरिक संतापले असून, काल(ता.२०) राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम व आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर १० हजार नागरिकांचा मोर्चा काढला. आज आदिवासी विद्यार्थी संघाने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात धडक दिली. या पार्श्वभूमीवर खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला आ.डॉ.देवराव होळी, सुधाकर यनगंधलवार, रमेश भुरसे, जि.प.सदस्य प्रशांत वाघरे डॉ.भारत खटी, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, प्रशांत भृगूवार, श्याम वाढई, अनिल कुनघाडकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते