१ मे पासून अदानीला होणारा पाणीपुरवठा बंद

0
8

तिरोडा- तालुक्यातील शेतकर्‍यांकरिता वरदान ठरणारा धापेवाडा सिंचन प्रकल्प संकटात सापडला आहे. आता प्रकल्पात ४ दशलक्ष घन मीटर पाणी शिल्लक आहे. हे पाणी ३० एप्रिलपर्यंत उपयोगात येणार आहे. २० मेपर्यंत प्रकल्पातील संपूर्ण साठा संपणार असल्याने १ मे पासून अदानीला होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्याने दिली.धापेवाडा सिंचन प्रकल्पात १७.५ दशलक्ष घन मीटर पाणी साठा ठेवण्याची क्षमता आहे. आता या धरणात ४ दशलक्ष घन मिटर पाणी शिल्लक आहे. पाण्याअभावी रबी पिक संकटात आले. त्यामुळे गुरुवारी तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या दारी २५ ते ३० शेतकर्‍यांनी ठिय्या ठोकून पाण्याची समस्या सांगितली. बन्सोड यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प.रा. यासतवार यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल महिन्यात पाण्याची समस्या निर्माण झाली. यावेळी उपलब्ध साठय़ातून शेतकर्‍यांना दोन ते अडीच दशलक्ष घनमिटर पाण्याची आवश्यकता आहे. यातून अदानी उद्योगाला पाणी द्यायचा आहे. पिण्याचे पाणी आणि नैसर्गिकरित्या कमी होणारे पाणी लक्षात घेता ३० एप्रिल २०१६ पर्यंत पाणी पुरवठा केला जावू शकतो. याकरिता १ मे २०१६ पासून अदानी पॉवर प्लांटला पुरवठा केला जाणारा पाणी बंद करण्यात येणार आहे. १६एप्रिलला पाणीसाठा आणि खर्च करण्यात येणारा कालावधी काढण्यात आला. १५ मे पर्यंत ५ दशलक्ष घनमिटर पाणी साठा असणे अपेक्षित होते.