डोंगरगाव परिसरात वाघाचा मृत्यु

0
10

सिंदेवाही- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या डोंगरगाव जंगल परिसरात आज सकाळी पुन्हा एका वाघाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे मृतावस्थेत आढळलेला वाघ हा पुर्ण वाढ झालेला वाघ असल्याचे वनविभागाच्या सुत्रांचे म्हणने आहे.सिंदेवाही परिसरात वाघांच्या मृत्युच्या प्रमाणात होत असलेली वाढ चिंतनीय ठरु लागली आहे.