शर्माच्या अटकपूर्व जामिनावर २९ ला निर्णय

0
5


दोघांना एमसीआर : यादव हल्ल्यातील आरोपींना २७ पर्यंत पीसीआर
गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मंगळवारी (दि.२६) झालेल्ङ्मा सुनावणी दरम्ङ्मान दोन्ही पक्षानी आपली बाजू स्पष्टपणे ‘ांडत अग्रवाल ङ्मांच्ङ्मावकीलांनी आरोपींना जा‘ीन देण्ङ्मास विरोध केला.तर शर्‘ा ङ्मांच्ङ्मावतीने आपली बाजू स्पष्टकरीत जा‘ीन ‘ागण्ङ्मात आले.दोन्ही पक्षांची चर्चा एैकल्ङ्मानंतर न्ङ्माङ्मालङ्माने ङ्मेत्ङ्मा २९ एप्रिलला सुनावणीची तारीख निश्चित केली. तर शर्‘ाला मदत केल्यामुळे अटकेत असलेल्या दोघांना बुधवारपर्यंत (दि.२७) न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
शर्मा याने वकिलामार्फत १९ एप्रिल रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र अर्जावर न्यायालयाने मंगळवारी (दि.२६) सुनावणी करण्याचे आदेश दिले होते.त्ङ्मानुसार आज ‘ंगळवारी चर्चा झाली.त्ङ्मावर तीन दिवसांनी म्हणजे २९ ला सुनावणी करण्ङ्माचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे शिव शर्माला या प्रकरणात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिमेष ऊर्फराज लक्ष्मीनारायण दुबे (रा. गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (रा. मरारटोली) या दोघांना अटक केली होती. दोघांचा पीसीआर संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.
यात त्यांना न्यायाधीश ए.बी. तहसीलदार यांनी पुन्हा ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या शिवाय नगरसेवक पंकज यादव यांच्यावर हल्ला करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
यातील दोन अल्पवयीन असून त्यांना सोडून राजा महेश सांडेकर (२१), निशांत उमेश छडीमलक, सौरभ बिरीया (रा.सावराटोली) व हरी नंदलाल चौधरी (३८, रा.मरारटोली) या चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी (दि.२५) त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडीत पाठविले आहे.