ब्राम्हण समाजाचा सामुहिक विवाह सोहळा शुक्रवारी

0
8

गोंदिया, २८ एप्रिल : येथील ब्राम्हण समाजाद्वारे ब्राम्हण समाज सामुहिक विवाह व यज्ञोपवित संस्कार सोहळा शुक्रवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैतू साव मठाचे समाजसेवक अजय तिवारी राहतील. यावेळी रायपूरचे आमदार सत्यनारायण शर्मा, छत्तीसगडचे मंत्री विधान मिश्रा, रायपूरचे महापौर प्रमोद दुबे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.