पालकमंत्र्यानी केली गारपीटग्रस्त गावांची पाहणी

0
9

गोरेगाव,दि.१ : गेल्या एप्रिल महिन्यात २७ तारखेला आलेल्या अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे गोरेगाव तालुक्यातील डव्वा, सटवा, गणखैरा व दवडीपार या गावातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांची व शेतीची पाहणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज (ता.१) केली.त्यांच्यासोबत आमदार विजय रहागंडाले,जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आदी अधिकारी होते.
२७ एप्रिल रोजी आलेला वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील २२ गावातील ९२१ घरांचे ४७ लाख ३४ हजार रुपयांचे नुकसान तर ३१८ हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान, गोंदिया तालुक्यातील १८ गावातील ९६ घरांचे व २० हेक्टर शेतीचे, तिरोडा तालुक्यातील ३ गावातील १४ घरांचे आणि आमगाव तालुक्यातील ३४ घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
झालेल्या नुकसानीची माहिती नुकसानग्रस्तांकडून जाणून घेतली. २७ एप्रिलच्या रात्री आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील अनेक गावातील घरांचे व शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांनी २८ एप्रिल रोजीच जिल्हा प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने त्यांनी आज नुकसानग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी केली.डव्वा येथील श्यामराव मेश्राम व सुमेंद्र कटरे, सटवा येथील पुरणलाल ठाकूर, गणखैरा येथील नुखलाल पारधी यांच्या नुकसान झालेल्या घरांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. सटवा येथील शेतकरी मोडकुजी बघेले, दवडीपार येथील शेतकरी भाकचंद कटरे यांच्या नुकसान झालेल्या धान पिकाच्या शेतीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतीच्या व घराच्या नुकसानीचे तातडीने सव्र्हेक्षण करावे, त्यामुळे नुकसानग्रस्तांना शक्य तेवढ्या लवकर मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांना दिले.
नुकसानग्रस्त गावांची पाहणी करताना पालकमंत्र्यासोबत आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी,जीडीसीसी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,माजी.प.स.सदस्य साहेबलाल कटरे,दवडीपारचे उपसरपंच पुनेश्वर राऊत,तंटामुक्त समिती अध्यक्ष हि.द.कटरे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती वरखेडे, सटवा सरपंच रमेश ठाकूर, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.के.टी.कटरे, माजी सरपंच महादेव वाणे, भागचंद रहांगडाले,ग्रा.प.सदस्य मालीकचंद कटरे,हिरालाल पारधी,संजय बारेवार प्रामुख्याने उपस्थित होते.