पावसाळ्यातील पाण्याचा थेंब न थेंब वाचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
12

नागपूर : भविष्यात दुष्काळाची झळ पोहचू नये यासाठी पाण्याचा थेंब न थेंब वाचवावा व शेती समृद्ध करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. 

आज कस्तुरचंद पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहपोलीस आयुक्त राजवर्धन होते. 

पालकमंत्री म्हणाले, मराठवाड्यात गेल्या तीन वर्षापासून पाऊस कमी पडल्यामुळे तेथील जनतेला व शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. विदर्भासह इतर भागात पाणीटंचाई ‍निर्माण होऊ नये, यासाठी येणाऱ्या पावसाचे पाणी वाचविण्याचे नियोजन शासन करीत आहे. यासाठी जनतेने पावसाचा थेंब न थेंब वाचवून पाणीटंचाईवर मात करावी.

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील 8023 शेतकऱ्यांचे 15 कोटी 19 लाख रुपयांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. त्यांचेकडून गहाण ठेवलेल्या वस्तू घेऊन जाण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना 10 हजार 582 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस सेवेत उत्कृष्ट सेवा करणाऱ्‍या अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले, त्यामध्ये संजय भिकाजी पांडे पोलीस निरीक्षक, ईश्वर देवरावजी किनकर स. फौजदार, गोविंद रामजी वानखेडे पोलीस हवालदार, अशोक सोमाजी तिडके पोलीस हवालदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण केल्याने यांचे कठीण खडतर कामगिरीबद्दल त्यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यात राजेंद्र विनायक वडयाळकर, पोलीस निरीक्षक, श्रीमती छायाताई दौलतराव येलकेवाड, सहा. पो. निरीक्षक, गणेश कुमार फुलकवर, सहा पोलीस निरीक्षक, ईश्वर संभाजी हनवते, सहा. पोलीस निरीक्षक, अशोक रघुनाथ गेडाम, पोलीस उपनिरीक्षक, सुनील रामेश्वर चांदेकर, वरीष्ठ गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, सध्या विगुवि (नक्षल), नागपूर, अब्दूल शेख बापूमिया, गुप्तवार्ता अधिकारी राज्य गुप्तवार्ता विभाग, केंद्र विसुशा, नागपूर, बळीराम अर्जून वाहने, पोलीस हवालदार, पोलीस अधीक्षक कार्यालय, गुन्हे अन्वेशन विभाग, नागपूर, पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर (ग्रामीण) नरसिंह तुकाराम शेरखाने, अप्पर पोलीस अधीक्षक, शांताराम गंगारामजी मुदमाळी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अधीकक्ष, लोहमार्ग, नागपूर कार्यालय, उत्तम आबा खैरमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान उत्कृष्ठ तलाठी बी.एस. सावरकर, नागपूर (ग्रामीण) रोख 5 हजार रुपये व प्रशस्तीपत्र तसेच नागपूर जिल्ह्याचे आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ अंतर्गत दीपक साळीवकर यांचाही सत्कार, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.दीपक साळीवकर यांनी केले.