भातखाचराने शेतकèयांनी आपला विकास साधावा : चौधरी

0
5
गोरेगाव-शेतकèयांनी आपल्या शेतात भातखाचराचे काम केल्यास जमीन सपाटीकरण होवून पाणी साचण्यास मदत होते. त्याप्रमाणे पाळीवर माती टाकून तूरपिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येते असल्याने जास्तीत जास्त शेतकèयांनी आपल्या शेतात भातखाचराचे काम करून आपला विकास साधावा, असे प्रतिपदान गोरेगाव पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी यांनी केले
१ मे रोजी सटवा येथील शेतकरी रहांगडाले यांच्या शेतात भातखाचर कामाचे भूमिपूजन सभापती चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खंडविकास अधिकारी हरिणखेडे, जि.प. सदस्या रोहिणी वरखडे, सरपंच रमेश ठाकूर, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश रहांगडाले, कुवरलाल रहांगडाले, डॉ.के.टी. कटरे, माजी सरपंच महादेव राणे, भोजराज बघेले, रामकिशोर वरखडे, गणराज रहांगडाले आदी उपस्थित होते. सभापती चौधरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने विविध कामांचे नियोजन करण्यात येत असून शेतकèयांनी शेतीसंबंधित कामाचे नियोजन करून आपला विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले. खंडविकास अधिकारी हरिणखेडे यांनीही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्त कामाचे नियोजन करून कामे सुरू करण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन भागचंद्र रहांगडाले यांनी तर आभार नितीन कटरे यांनी मानले.