वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सकांशी भाजपा जिल्हाध्यक्षची चर्चा

0
4

गोंदिया- : येथील बाई गंगा बाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा रक्षक, वीज त्याच बरोबर स्वच्छतेसह अनेक आवश्यक गरजांची पुर्तता करणे हे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्य असून रुग्णालयातील समस्येचे निराकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी रुग्णालय प्रशासनातील अधिकाèयांशी चर्चे दरम्यान केली.
त्यांनी आज, ४ मे रोजी बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला भेट देवून तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान, त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ दोड़के यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी रुग्णालायातील स्वच्छतेच्या समस्यांच्या बाबतीत चर्चा करून रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावा व सफाई यंत्रणा पूर्ववत करावी. तसेच सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून रुग्णालयातील कुचकामी ठरत असलेली सुरक्षा यंत्रणेला कामावर लावण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातुन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांना वैद्यकीय अधीक्षकना बोलावून तात्काळ निर्णय घेऊन रुग्णांच्या समस्या सोडविण्याचे सांगितले.
तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली. याच प्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाèयांनादेखील बोलावून रुग्णालयाच्या परिसरात कुठल्याही प्रकारचा कचरा न ठेवता परिसर स्वच्छ ठेवण्याचे सांगितले. दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धकाते व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दोड़के यांनी सर्व समस्यांचे निराकरण तात्काळ करण्याचे आश्वासन दिले. या वेळी प्रामुख्याने भाजपचे पदाधिकारी सुनील केलनका, भरत क्षत्रिय, दीपक कदम, संजय कुलकर्णी, पंकज रहांगडाले, संजय मुरकुटे, ऋषिकांत साहू, ,मुकेश हलमारे, कुशल अग्रवाल आदी  उपस्थित होते.