बरबसपुèयात हेमराज तांडेकर मृत्यू प्रकरण : पाच जणांना अटक

0
8

गोंदिया : दहा ते पंधराच्या संख्येतील गावगुंडांनी हेमराज तांडेकर (वय ६५, रा. बरबसपुरा) यांच्या घरावर हल्ला चढविला. त्यानंतर घरातील पाच जणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत हेमराज तांडेकर यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ६) रात्री घडलेल्या या घटनेची माहिती होताच आज, रविवारी बरबपुरा येथे सकाळपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सध्या गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे.
या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी शरद शेंडे, भवा दमाहे, अजब दमाहे, दीपक दमाहे, जितेंद्र दमाहे यांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
बरबसपुरा येथील संजय हेमराज तांडेकर (वय ४०) यांच्या भाचीला गावातीलच शरद शेंडे हा जाता- येताना त्रास देत होता. त्यामुळे त्यांनी शरदला चार दिवसांपूर्वीच हटकले. समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, राग मनात असलेल्या शरदने १० ते १५ जणांना सोबत घेऊन शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तांडेकर यांच्या घरावर हल्ला केला. या हल्लेखोरांनी घरात असलेल्या हेमराज शिवचरण तांडेकर (वय ६५), संजय तांडेकर (वय ४०), सुनीता विनोद बरेले (वय ३५) व विक्की संजय तांडेकर (वय १६) यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी पोलिसांत तक्रार केली तर, सगळ्यांना जिवानीशी ठार मारू, अशी धमकी दिली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हेमराज तांडेकर यांचा नागपूरला नेत असताना वाटेत मृत्यू झाला तर, चारजण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळपासून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता गोंदिया ग्रामीण पोलिस व एसआरपीची चमू तैनात आहे. सध्या तणावपूर्ण शांतता असून, गावाला पोलिस छावणीचे रूप आले आहे. गोंदियातील केटीएस रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृत हेमराज तांडेकर यांच्यावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त गावकèयांनी केली आहे.