राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त शेतकèयांना खरीप पीक कर्ज दयावे- डॉ.विजय सूर्यवंशी

0
12

गोंदिया,दि.८ : जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकèयांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. हे प्रमाण जिल्ह्यातील शेतकèयांची संख्या पाहता अत्यंत कमी असून राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खातेदार शेतकèयांना खरीप पीक कर्जाचे वाटप करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील बँक व्यवस्थापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना डॉ.सूर्यवंशी बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात शेतकèयांना बँकाद्वारे जे कर्ज वाटप करण्यात येते त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ६० टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा ४० टक्के आहे. कर्जदार शेतकèयांची संख्या लक्षात घेता ७५ टक्के शेतकèयांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटप करते तर केवळ २५ टक्के शेतकèयांना राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक कर्ज वाटप करते. कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकरी यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राष्ट्रीयकृत बँका व ग्रामीण बँकांनी घ्यावे असे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५० हजार नवीन सभासद शेतकèयाना कर्ज वाटप या बँकांनी करावे. कर्ज वाटपात सुलभता येण्यासाठी बँकांनी मंडळ स्तरावर कर्ज मेळावे घ्यावे. कर्ज घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे याची माहिती बँकांनी दर्शनी भागात लावावी. संबंधित शेतकèयांना त्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज घेणे सोईचे होईल असेही त्यांनी सांगितले.
सन २०१५-१६ च्या हंगामात जिल्ह्यातील १०९ गावांची अंतीम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, या गावातील शेतकèयांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठण करुन त्या गावातील शेतकèयांना कर्ज वाटप करावे. पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकèयांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे. बँकांमार्फत राबविण्यात येणाèया केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकèयांसह नागरिकांना देण्यासाठी बँकांच्या अधिकारी व कर्मचाèयांनी सामाजिक उत्तरदायित्वातून काम करावे असेही डॉ.सूर्यवंशी यावेळी म्हणाले.