आरोग्यमंत्री डाॅ.सावंत बीजीडब्लूच्या भोंगळ कारभार तपासणार काय ?

0
27
     Dr. Deepak Sawant          खेमेंद्र कटरे
               गोंदिया-पुर्व विदर्भातील मोठे महिलासांठीचे  रुग्णालय गोंदियात बाई गंगाबाई या नावाने सुरु असले तरी या रुग्णालयात चालणारा भोगंळ कारभार आणि                                             त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करीत नेहमीच मी सर्व प्रकरणाची माहिती वरिष्ठांना कळविली आहे एवढे सांगून गप्प बसणारे या रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्याला  आपल्या स्तुतीपर वृत्ताशिवाय काहीच दिसत नसल्याने आरोग्य सेेवेचे तिनतेरा वाजले आहेत.त्यातच उद्या सोमवारला राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ.दिपक सावंत साहेब पहिल्यांदाच गोंदिया जिल्हा भेटीवर येत आहेत.
ते आपल्या या भेटीदरम्यान आरोग्य सेवेचा आढावा सुद्दा घेणार आहेत.त्यांनी आढावा घेतांना काही खालील गोष्टीकडे सुध्दा लक्ष द्यावे या निमित्ताने बीजीडब्लू आणि केटीएस रुग्णालयातील सावळागोंधळ असलेल्या काही प्रकाराचा उल्लेख त्यांच्यासाठी करण्यात येत आहे.महिलांचे मोठे रुग्णालय असून याठिकाणी अद्यापही डाॅक्टरांची संख्या कमी आहे.डाॅ.दोडके व डाॅ.मोहबे यांना बाबुगिरीच्या कामात अधिक वेळ चालले त्यातही मोहबे काही रुग्णसेवा करताना दिसतात.
आजही वर्ग 2 चे 7 आणि वर्ग 1 चे 3 वैद्यिकय अधिकारीचे पद रिक्त आहे,सोबतच या रुग्णालयातील महत्वाचे शिशुचिकित्सकाचे पदही रिक्त पडले आहे.डाॅ.मोहबे व डाॅ.दोडके हे शिशुचिकीत्सक असले तरी त्यांचा काही तेवढा उपयोग होतांना दिसून येत नाही.या रुग्णालयातून कधीच निशुल्क रुग्णवाहिकेचा लाभ रुग्णांच्या नातेवाईकांना दिला जात नाही.त्यातच राजीव गांधी जिवनदायी योजनेतील अनेक शस्त्रक्रिया अद्यापही पेडींग आहेत परंतु उद्याच्या आढावा बैठकीत त्या झाल्याचे सुध्दा दाखवायला आरोग्य प्रशासन मागे पुढे बघणार नाही.
राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ.दिपक सावंत साहेब आपण सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच गोंदियाला येत आहात आपले स्वागत आहे.आपण सामान्य नागरिकांशी अवश्य भेटून या दोन्ही रुग्णालयातील सावळागोंधळ समजून घ्यावा.त्याआधीच तुमच्यासत्कारासाठी मोमेंटो घेऊन काही उभेही असतील तो ही अवश्य स्विकारावा परंतु या दोन्ही रुग्णालयाची जी वाताहत झाली आहे,त्याच्या सखोल चौकशीसाठीही आपण पुढाकार घेतला पाहिजे.केटीएसमधील नोकरभरती,साहित्य खरेदी,पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणपत्र मोमेटोंपासून ते बॅनरपर्यंतच्या सर्वच गोष्टींचा आपण सखोल आढावा घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यकाळातील प्रत्येक बाबींच्या तपासासाठी चौकशी समिती नेमल्यास मोठा घोटाळा समोर येऊ शकतो जसे की 20-25 हजार रुपयात तयार होणार्या वेबसाईटसाठी जर 40-45 हजार खर्च होत असतील तर काय म्हणावे.त्यातही शासकीय रुग्णालयासाठी वेबसाईट करायचीच असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात एनआयसी असताना खासगी व्यक्तीला त्याचे काम देण्यामागचे धोरण काय या सर्व गोष्टींचा आणि रुग्णालयातील वाॅर्डात असणारी अस्वच्छेतला जबाबदार व्यक्तीच्या कामचुकार पणाचा आपण नक्कीच आढावा घ्यायला हवा.
त्यातच बीजीडब्लू रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी डाॅ.अन्सारी खान या कधी रुग्णालयात आल्या असतील याबद्दल कुणाला माहिती विचारल्यास कुणीही काहीही सांगत नाही.सोबत डाॅ.इम्रान खान यांच्या कार्यालयातील हजेरीचा सुध्दा आढावा घ्यायला हवा.थंब मशिनवर त्यांचे दररोजचे आंगठे असतात काय किती वाजता येतात आणि जातात त्यासोबतच हजेरी रजीस्टरवर सुध्दा स्वाक्षरी दररोज होते काय याची तपासणी कुणी करायचा हा सुध्दा काहींनी उपस्थित केला आहे.
ना.सावंत साहेब एकीकडे रुग्णालयाला काहीही लागले तर त्याची खरेदीची एक प्रकिया असते त्यानंतरही बीजीडब्लू रुग्णालयात 9 लाख रुपयाच्या जवळपासची औषध खरेदी स्थानिक पातळीवर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महागडे इंजेक्श्न आणि टाॅनिक्स बाहेरुन खरेदी पेंशंटवर खरेदी करण्याची वेळ येते यामाध्यमातून जे रुग्ण बाहेरुन खरेदी करुन आणतात त्यावर 1500-2000 रुपये कमीशन बीजीडब्लूच्या डाॅक्टरांना त्या मेडीकल दुकानातून मिळत असल्याची चर्चा आहे,याचा सुध्दा शोध घेऊन सामान्य गोरगरीब रुग्णांची लुट करणारे डाॅक्टर कोण याचा शोध होणे महत्वाचे आहे.विशेष म्हणजे मार्चमहिन्यात रक्तपेढीकरीता एलीसा किटस खरेदी करण्यात आली असून महागडी किटस असली तरी त्या किटसची क्वालीटी मात्र पाहिजे तशी नसल्याची चर्चा त्या महिन्यातच रुग्णालयातील कर्मचारी वर्गात होती.त्यातही खासगी पॅथालाजी लॅबचेही या रुग्णालयातून लक्ष ठेवले जात आहे.मार्चमहिन्याच्या अखेरीस रुग्ण कल्याण समितीने अखेरच्या क्षणी केलेल्या 50 लाख रुपयाच्या खरेदीची निष्पक्ष चौकशी होणे सुध्दा गरजेचे आहे.
बाई गंगाबाई रुग्णालय म्हणजे घाणीचे दुसरे माहेर घर म्हटले तरी कमी पडणार आहे.वैद्यकिय अधिक्षकाच्या कार्यालयाशेजारीच एवढी घाण असते की त्यांना ही दिसत नाही.परिसरात रुग्णाच्या नातेवाईंकानी कशीही ठेवलेली वाहने त्याचेही नियोजन नाही.परंतु अवैधरित्या या रुग्णालयात कुठलीही निविदा न काढता सायकलस्टँंड मात्र सुरु असतो.रात्रीला काही गावगुंडाचा वावर त्यामुळे रुग्णालयातील महिला कर्मचार्यांना होणारा त्रास वेगळाच आहे.पोलीस चौकी देण्यात आली मात्र त्याठिकाणी कधीच पोलीस राहत नाही.जर राहिल्या तर त्यांचा काही धावपळ करण्यासारखी स्थिती राहत नाही.गेल्या काही दिवसापुर्वीच या रुग्णालयातून सकाळी सकाळी एका मुलाला चोरुन नेण्याचा प्रयत्न झाला.आपल्या नातेवाईकाला भेटायला आलेल्या एका होमगार्डला तो प्रकार लक्षात येताच त्यांने आरडा ओरड करुन त्या युवकाला ताब्यात घेतले.तरीही त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांचेच नव्हे तर सुरक्षा रक्षकांचे लक्ष नव्हते यावरुन किती गोंधळाची स्थिती असेल न बोललेच बरे.त्यातही लाखो रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले परंतु एकाही कामाचे नाही.ज्या वार्डातून मुलगा चोरुन नेला जात होता त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा तब्बल 15 दिवसापासून बंद होता.विशेष म्हणजे तो कॅमेरा सुरु करण्यासाठी एकदा दुरुस्ती सुध्दा करण्यात आली त्यानंतरही त्यात रेकाडीर्ंग होते की नाही हे तपासण्याचे साधे सौजन्य या रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.सजिंव दोडके यांनी केले नसल्याचे त्या प्रकरणात समोर आले होते.
त्यांच्याच कार्यकाळात येथील एकमेव रक्तपेढीमध्ये अनियमतेतप्रकरणी एफडीआयच्या अधिकार्यानी सील केल्याने रक्तपेढी बंद करण्यात आली होती.विज गेल्यावर सुध्दा जनरेटरची व्यवस्था या रुग्णालयात व्यवस्थित राहत नाही.त्यातच प्रसुतीसाठी आलेल्या प्रत्येक महिलेच्या नातेवाईकाकडून येथील डाॅक्टर प्रत्येकी 2 ते 4 हजार रुपये घेतल्याशिवाय प्रसुती शस्त्रक्रिया करीत नाही.याचे उदाहरणच द्वाययाचे झाल्यास सिव्हील लाईन स्थित एका भाजपशी निगडीत पदाधिकारी असलेल्या व्यक्तीकडे कामासाठी येणार्या रावणवाडी परिसरातील महिलेची नातेवाईक प्रसुतीसाठी आली असता तीला आधी 4 हजार रुपये मागण्यात आले.संबधित डाॅक्टरने ते पैसे हातातही घेतले त्यानंतर जेव्हा त्या महिलेने आपण त्यांच्याकडे काम करतो त्यांनी तुम्हाला नाव सागांयला सांगितले असे म्हणताच त्या डाॅक्टरने हातात घेतलेले 4 हजार परत केले यावरुन संबधित डाॅक्टर जर पैसे घेत असेल तर तो वाटा कुणाकुणाला जातो याचाही शोध व्हायला हवा.
चर्चेनुसार त्यात लोकशाहीच्या चौथा स्तंभ मानल्या जाणार्या वृत्तपत्राच्या काही पत्रकारांना हे डाॅक्टर आपल्या विरोधात वृत्त येऊ नये तसेच मार्च महिन्याचा शेवट व दिवाळीच्यावेळी पेड न्युज प्रकाशित करुन आपली स्तुती करण्यासाठी वापरत असल्याची चर्चा असल्याने अशा पत्रकारामूळे इतर पत्रकारांची बदनामी या रुग्णलयातील काही बिनकामी डाॅक्टरामूळे सुध्दा होऊ लागली आहे.तर काहींनी आपण पत्रकार असल्याचे दाखवत आपली नवी दुकानदारी सुरु केली आहे.विशेष म्हणजे एकाद्या रुग्णालयासाठी काहीही करायचे असेल किंवा प्रसिध्दीही करायची असेल त्यासाठी पत्रके छापायची असली तरी निविदा काढावी लागते परंतु सध्या बीजीडब्लू आणि केटीएसमध्ये तर या रुग्णालयातील प्रमुखांनी अर्धे अर्धेसाठी एका खास संस्थेला निवडून शासकीय पैशाची बंदरबाट लावल्याचे खुलआम बोलले जात असून जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेले काही अधिकारी सुध्दा हारतुरे स्किवारुन गप्प बसल्याचे बोलले जात आहे.या सर्व प्रकऱणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
05 April 08
bgw hopital