मोठे आंदोलन दाखवा,स्वतंत्र विदर्भ देऊ- गडकरींचा सल्ला

0
22
नागपूर – विदर्भाचे राज्य झाले पाहिजे. आम्ही त्यासाठी कमिटेड आहोत. विदर्भाच्या चळवळीने जोर पकडला पाहिजे. तुमच्या काळात झाले तसे मोठे आंदोलन सरकारला दिसू द्या, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिला.
विदर्भाच्या मुद्द्यावर अलीकडे गडकरी यांनी मौन बाळगले आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्याच्या मागणीसह अन्य काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जांबुवंतराव धोटे हे कार्यकर्त्यांसह गडकरी वाड्यावर गेले होते. या वेळी चर्चा करताना गडकरी यांनी विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत भाजप कमिटेड असल्याचे सांगितले.