ना बड़ोले यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

0
10

चिखली व कनेरी केंद्र सुरु
सड़क अर्जुनी – आदिवासी विविध कार्यकारी संस्थेअंतर्गत चिखली येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन १५ मे रोजी पालकमंत्री राजकुमार बड़ोले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कनेरी या केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री राजुरकर, उपप्रादेशिक व्यवस्थापक राहुल पाटिल, गट विकास अधिकारी झामसिंग टेंभरे, माजी प. स. सभापती पद्मा परतेकी, आदिवासी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, प. स. सदस्य राजेश कठाणे, गिरधर हत्तीमारे, संचालक रामजी कुरसुंगे, ओमप्रकाश राणे, वामन मोटधरे, खेमराज भेंडारकर, धनराज गहाणे, अर्जुन घरोटे, सचिव रामदास डोये, सदाराम लांजेवार, हितेश डोंगरे, केंद्रप्रमुख खुशाल चचाने, यादवराव मलये, खोजराम धनभाते, माधवराव हुकरे, भागवत पुस्तोडे, आनंद कुरसुंगे, मार्कंड बड़ोले, मोहन हत्तीमारे, मोहन भेंडारकर आदि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.