शासकीय रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक

0
4

गोंदिया-येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.जेणेकरून या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी येताना व उपचार झाल्यानंतर घरी परत सोडण्यासाठी या रुग्णवाहिकाच उपयोग व्हावा.त्यातच कुठेहीअपघात झाला तर १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावण्यात येऊ शकते.रुग्णवाहिका त्याठिकाणी पोचतेही परंतु गेल्या काही दिवसापासून या रुग्णालयातीलच नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतूनही प्रवासी वाहतूक होत असल्याची ओरड होती.ती रविवार(दि.१५)रोजी सायकांळी साडेसात वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष अनुभवायास मिळाले.रुग्णाला तातडीने उपचार मिळावे यासाठी नेहमीच कार्यरत असणारे समाजसेवी कुशल अग्रवाल यांनी आज येथील नेहरू चौकात सायकांळी रुग्णवाहिकेतून प्रवास्यांची वाहतूक करताना तसेच त्यांच्याकडून पैसे घेताना पकडले .त्यांनी यासंबंधीची तक्रार लगेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते यांच्याकडे केली.