लाचेची मगणी करणाèया रोजगारसेवकावर गुन्हा

0
12

तिरोडा, (जि. गोंदिया), ता. १९ : मजुरी वाढवून देण्यासाठी गँगमेटकडे ५४० रुपये लाचेची मागणी करणाèया रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी (ता. १९) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सुरेश सुखदेव मरघडे (वय ५०, रोजगारसेवक मुरपार ) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे मुरपार येथे रोजगार हमीच्या कामावर गँगमेट म्हणून काम करतात. त्यांच्या हाताखाली सहा मजूर आहेत. ४ मे रोजी नाला खोदकाम व सपाकाईचे काम करण्यात आले. या वेळी रोजगारसेवक सुरेश मरघडे याने मजुरीत वाढ करण्यासाठी ५४० रुपयांची ममागणी गँगमेटकडे केली. परंतु, ही रक्कम देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने ५ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, पथकाने ६ मे रोजी कामाच्या ठिकाणी पडताळणी केली. या वेळी रोजगारसेवक सुरेश मरघडे लाच मागत असल्याची खात्री झाली. दरम्यान, गुरूवारी सापळा रचण्यात आला. या वेळी रोजगारसेवक मरघडे याने लाच घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्याच्याविरूद्ध तिरोडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.