प्रफुलभाईच्या काळातील एअरहोस्टेस घरीच,भाजपचा नवा फंडा

0
12

गोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले मित्र परिवार व जिल्हा भाजपाच्या संयुक्त विद्यमाने एअर इंडियातील ३०० रिक्त एअर होस्टेस व कॅबिन क्रु पदाकरीता भरती पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन २१ व २२ मे रोजी येथील स्वागत लॉनमध्ये करण्यात आले आहे.हा कार्यकम शासकीय नसून खासगी एका संस्थेच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्रीचे व भाजपचे प्रसिद्दी प्रमुख जयंत शुक्ला यांनी बेरार टाईम्सला दिली.तर पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्य श्री बनसोडे यांनी ही कार्यशाऴा फक्त गोंदिया जिल्ह्यासाठी पालकमंत्री घेत असल्याचे सांगितले.नागपूरला आमदार अनिल सोले यांनी हा कार्यक्रम घेतल्याचेही सांगितले असले तरी 300 जागासाठी हजारो युवकाकंडून एक हजाराचा डीडी मागविला जात आहे.रक्कम सद्याच्या काळात ईतर परिक्षेसारखे असले तरी गरीबांसाठी रक्कम मोठी असते.

परंतु एयर ईडियांची अशी जाहिरात अद्यापही सरकारचे न्युजपोर्टल महान्युज वर सुद्दा बघिवयास मिळत नाही. परंतु एअरईंडियाशी संबधित सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागा  कंत्रांटी तत्वावर खासगी कंपनीच्या अधीन राहतात.त्यातच यासबंधीची परीक्षा महत्वाची असते,ती उत्तीर्ण होणे आवश्यक असले तरी कुठलीही जाहिरात मात्र यासंबधीची दिसत नसल्याने युवकांची फसवणुक होऊ नये म्हणजे झाले.

विशेष म्हणजे केंद्रांत कांगे्रस आघाडीचे सरकार  असताना  भंडारा गोंदियाचे खासदार प्रफुल पटेल हे त्यावेळी विमान वाहतुक मंत्री होते.त्यांच्या काळात राज्यसरकारच्याआदिवासी विभागासोबत आदिवासी युवतींना एयर होस्टेस बनविण्यासाठी पुण्याच्या एका संस्थेला कंत्राट देण्यात आले होते.त्या संस्थेने प्रशिक्षणही दिले.त्या प्रशिक्षणादरम्यान काय काय झाले याचा पाडा त्या मुलींनी नंतर वाचला सुद्दा होता.आज त्या मुली काय करतात याचा शोध घेतल्यावर दिसून येईल की त्याआपल्या घरीच बसून कुठेही त्यांना स्थान मिळाले नाही.

त्या आजही गरीच बसलेल्या असतांना बार्टीच्या माध्यमातून 3४ तरूण-तरूणींची निवड गोंदिया जिल्ह्यातून होऊन एअर इंडियात नोकरी मिळाल्याचे  सांगत आहे. यांची यादी मागितली असता न नावे उपलब्ध करुन देण्यात येईल असे श्री शुक्ला व श्री बनसोडे यांनी सांगितले. परंतु कुठे तरी भाजपही प्रफुल पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेऊन एअर होस्टेस व कॅबिन क्रु चे दाखविलेले स्वप्न येणार्या नगरपरिषदेच्या निवडणुकावर डोळी ठेऊन तर नाही ना,कारण गेल्यावर्षी सुद्दा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पुर्वी सुद्दा असाच कार्यक्रम घेण्यात आला होता.त्याचे काय झाले हे सर्वांनाच ठाऊक आहे.जी भाजप विरोधात असतांना राष्ट्रवादीवर आरोप करायची आज तीच भाजप त्यांच्याच पावलावर पााऊल ठेऊन चालली आहे असे म्हणने वावगे होणार नाही.

वास्तविक हे कुठल्या प्रर्वगातीलआहेत याचाही खुलासा व्हायला हवे कारण बार्टी ही संस्थी फक्त अनुसूचित जातीच्या विकासासाठी आहे.यामध्ये पाहिजे तसेओबीसी,एसटीला महत्व नाही.एअर इंडियामध्ये एअर होस्टेस व कॅबिन क्रु या पदाकरिता सर्व जाती प्रवर्गातून ३०० जागा मुलाखतीव्दारे भरण्यात येणार असल्याचे पालकमंमंत्री यांचे स्विय सहाय्यक समीर बनसोडे यांनी व्हाटसअपच्या माध्यमातून जाहिर केले आहे.या 300 जागा संपुर्ण राज्यातून भरण्यात येणार की एकट्या गोंदिया जिल्ह्यातून याचा खुलासा सुद्दा व्हायला हवा होता.आणि गोंदिया जिल्ह्यात ज्या खासगी संस्थेमार्फत होत आहे,त्या संस्थेचे नाव सुद्दा जाहिर करायला हवे होते.पण तसे गेले नाही.सध्या मित्र परिवार एवढ्या जोरात आहे की सांगणे कठीण झाले.