शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीक कर्ज

0
11

शेतकरी कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन
गोंदिया,दि.१९ : जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय हा शेती असून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करतात. अनेकदा शेतकऱ्यांकडे बि-बियाणे, खते व मशागतीसाठी पैसा राहत नसल्यामुळे त्याला सावकारावर अवलंबून रहावे लागते. सावकार मोठा व्याजदराने कर्ज पुरवठा करीत असल्यामुळे कर्जाची परतफेड करतांना शेतकऱ्यांना कठीण आर्थिक परिस्थितीतून जावे लागते. प्रसंगी त्याला शेती पडीक ठेवण्याची वेळ येते. आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शेतकऱ्यांसाठी खरीप पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.
सालेकसा तालुक्यातील सालेकसा तहसिल कार्यालय येथे २३ मे रोजी, कावराबांध येथे २४ मे, साखरीटोला येथे २५ मे, बीजेपार येथे २६ मे आणि दर्रेकसा करीता जमाकुडो येथे २७ मे रोजी पीक कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गोंदिया तालुक्यातील कोचेवाडी येथे १६ मे, शिरपूर येथे १७ मे, रावणवाडी येथे १८ मे व २५ मे, नवगावकला येथे १८ मे, दांडेगाव येथे १९ मे, मोरवाही येथे २१ मे, घिवारी येथे १८ मे, इर्री येथे २० मे, सहेसपूर येथे १८ मे, निलागोंदी येथे २० मे, गंगाझरी- २४ मे व ३१ मे, कामठा- १९ व २६ मे, ढाकणी- १८ व २५ मे, धापेवाडा- २५ मे आणि काटी येथे २९ मे रोजी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तिरोडा तालुक्यातील केसलवाडा येथे २३ मे, सुकळी/डाक येथे २४ मे, नवेझरी- २५ मे, करटी/बुज.- २६ मे, बोपेसर- २७ मे, वडेगाव- ३० मे, तिरोडा- ३१ मे, चिखली- १ जून, कवलेवाडा- २ जून, परसवाडा- ३ जून, अर्जुनी- ४ जून व मेंढा येथे ६ जून, मुंडीकोटा येथे ७ जून, सरांडी- ८ जून आणि काचेवानी येथे ९ जून रोजी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे १९ मे, कालीमाटी- २० मे, सरकारटोला- २३ मे, कातुर्ली- २४ मे, घाटटेमनी- २६ मे, चिरचाळबांध- २७ मे, ठाणा- ३० मे, दहेगाव- ३१ मे, आमगाव- १ जून, अंजोरा- २ जून, तिगाव- ३ जून, जामखारी- ४ जून रोजी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील अर्जुनी येथे २४ मे, महागाव- २५ मे, नवेगाव- २६ मे, बोंडगाव- २७ मे, केशोरी येथे ३० मे रोजी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
देवरी तहसिल कार्यालय येथे २४ मे रोजी, चिचगड- २१ मे, सावली- २२ मे, पालांदूर/जमी.- २२ मे, ककोडी- २४ मे रोजी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरील सर्व तालुक्यातील संबंधित गावच्या ग्रामपंचायतमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या गावाशी संबंधित असलेल्या सेवा सहकारी संस्थांच्या गावातील शेतकऱ्यांसाठी हे पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात आले आहे.
वरील सर्व मेळाव्याला तहसिलदार, खंड विकास अधिकारी, सहायक निबंधक, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, बँकांचे अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सहकारी संस्थांचे गट सचिव हे शेतकऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा, आठ-अ, आधार कार्ड/मतदार ओळखपत्र, संबंधित बँकचे पासबुक, पासपोर्ट साईज २ फोटो व सात-बारावर एकापेक्षा अधिक खातेदार असल्यास संमत्तीपत्र पीक कर्ज मेळाव्यात सोबत आणावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामाकरीता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज वाटप करता येईल. जिल्ह्यातील जास्त शेतकऱ्यांनी पीक कर्ज वाटप मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.