राकेश कुमार ‘नीरी’चे नवे संचालक

0
17

नागपूर : ‘सीएसआयआर-नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्ट इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालकपदी डॉ.राकेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी पदभार हाती घेतला. याअगोदर ते ‘नीरी’च्या मुंबई प्रादेशिक प्रयोगशाळेत मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते.
डॉ.राकेश कुमार यांनी ‘आयआयटी’ पवई येथून पर्यावरण विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये ‘एमटेक’ केले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. वायू प्रदूषण नियंत्रण व व्यवस्थापन, शहरी वायू गुणवत्ता चाचपणी, उत्सर्जन आविष्करण, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन इत्यादी बाबींमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. सांडपाणी पुनर्वापरासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात डॉ.कुमार यांचे मौलिक योगदान राहिले आहे. पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञानातील योगदानासाठी त्यांना नऊ नामवंत आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ.कुमार यांच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय पेटंटसोबत प्रदूषण नियंत्रण शोधांशी संबंधित १0 पेटंट आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये त्यांच्या ९२ शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. पर्यावरण व अभियांत्रिकीशी संबंधित त्यांनी तीन स्व-अभ्यास पुस्तकेदेखील लिहिली आहेत. कार्यकारी संचालक डॉ.तपस नंदी यांच्याकडून त्यांनी सोमवारी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. (