पिंडकेपार आरोग्य उपकेंद्र  कुलुपबंद

0
9
गोंदिया-गोरेगाव तालुक्यातील पिडकेपार येते आरोग्य  उपकेंद्राच्या भव्य अशा प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांच्या हस्ते मार्च महिन्यात करण्यात आले होते.परंत ते उपकेंद्र  आजही उघडले गेले नाही.त्यामुळे आरोग्य  उपकेंद्राचा लाभ परिसरातील लोकांना अद्यापही मिळालेला नाही.केंद सुरु न झाल्याने प्रसुती महिलांना लांबच्या कुर्हाडी,कटंगी  व गोरेगाव येथे जाण्याची वेऴ आली आहे.पिंडकेपार येथून कुहाडी केंद्राचे अंतर हे सहा किमी  एवढे आहे.या उपकेंद्रातर्गत पिंडकेपार,कन्हारटोला,गराडा,जांभुलपाणी,सोदलागोंदी,रामाटोला गावांना सेवा मिळणार होती.दोन महिने लोटूनही हे केंद्र सुरु न झाल्याने नागरिकात असतोंष दिसून येत आहे.